Breaking News

खरे आदिवासी कोण ?

आदिवासींच्या नावाचा गैरफायदा घेऊन आदिवासी माणसांच्या सवलती मिळवण्यासाठी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे . आदिवासी जमातीच्या यादीत अनेक कावळ्यांचा ( List of the Scheduled Tribes ) समावेश करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु आहे खर्या आदिवासींच्या ताटातले काढून खोट्या आदिवासिना देऊन आदिवासी समाज नष्ट करण्यासाठी राजकीय मंडळी पुरेपूर प्रयत्न करत आहेत . या धर्तीवर खरे आणि खोटे आदिवासी कोण ? सत्यता काय हे आपणास माहित पाहिजे . 
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची ( Scheduled Tribes ) यादी अधिसूचित केली आहे . राज्यघटनेतील तरतुदीत अनुसूचित जमातींच्या संदर्भात असे स्पष्ट करण्यात करण्यात आले कि ,’ अनुसूचित जमात किंवा तिचा काही भाग किवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत अनुसूचित जमात किंवा फक्त संसद आदिसुच्ना जाहीर करू शकते . या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा / गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणे ,त्यात दुरुस्ती करणे किंवा एखाद्या गटास /उपगटास वगळण्याचा अधीकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे .” कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकार ला तो अधिकार नाही . राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही .
भारतीय राज्यघटनेतील हि इतकी ठळक तरतूद लक्क्षात न घेता आज अनुसूचित जमातीत घ्या म्हणून अनेक लोक बोंबा मारत आहेत तर अनेक पुढारी फक्त आपली मतपेटी साबूत ठेवण्यासाठी एका पाठोपाठ आश्वासने देत आहेत . आदिवासींमध्ये घ्या म्हणून मागणी करणार्यांचे प्रबोधन करण्याएवजी राजकीय लोक अजून या आगीला हवा देत असून पेटवण्याचा प्रयत्न्न करत आहेत .महाराष्ट्रात एकूण लहान मोठ्या ४७ जमातीचा समावेश अनुसूचित जमातींच्या यादीत करण्यात आलेला आहे या ४७ जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती /उपजमाती किंवा गट ,समूह यांच्यातील २८ जमाती गटांच्या ,उप गटाच्या नाम्सादृश किवा पुढे मागे काना ,मात्रा ,उकार वेलांटीचा दुरुपयोग करून बोगस आदिवासी जाती फायदा घेत आहेत .हे विधान खोटे नसून दि. २३/४/१९८६ च्या शासन निर्णयाने व डॉ. फरेरा कमिटीच्या आणि ना. सुधीर जोशी कमिटीच्या नियुक्तीने हे शिद्ध केले आहे .
सामाजिक व सांस्कृतिक उत्क्रांतीचा मार्ग समजण्यासाठी मानवी जीवनाचे सुरुवातीचे रूप आपल्याला आजच्या आदिवासी जमातींच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळते . स्वताला आदिवासी म्हणून घेणारे गट बिगर आदिवासी जाती गट ज्या आदिवासी गटाचे ते हक्क सांगतात त्या गटाशी त्यांचा कोणताही सांस्कृतिक ,सामाजिक , संबध दिसत नाही .तसेच ते खर्या आदिवासींच्या सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक कार्यात सण उत्सवात सहभागी होत नाहीत . एखाद्या गटाची किंवा समूहाची संस्कृती आणि व्यक्तिमत्व हि संपूर्णपणे /एकरूपी व्यूह ( holistic and integrated configuration ) असते .एकात्मिक सांस्कृतिच्या काही अंशात्मक भागात आदिवासी व बिगर आदिवासी जाती समुहात समानता आढळली तरी असे दोन समूह एक असत नाहीत . आदिवासी जमातीस किवा त्यातील एखाद्या उप जमातीस जेव्हा राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे अनुसूचित ज्मातीचां दर्जा देतात ( Status of S T) ,तेव्हा त्या जमातीच्या सांस्कृतिक व व्यक्तिमत्वाच्या वैशीष्ठयांची त्यांनी दखल घेतलेली असते .अर्थात हि वैशीष्ट आदिवासी संशोधन समिती व मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण शिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने ( T A C ) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही . जे बिगर आदिवासी जातीसमुह आदिवासी भागात राहतात आणि ज्यांचे आदिवासी जमातीशी नामसदृश असते किवा भौतिक सांस्कृतिक काही बाबींमध्ये दोघांत साम्य असते असे तोतया आदिवासी ब्रिटीश प्रशासकांच्या लेखनातून किंवा ब्रिटीश काळातील पुराव्यांतून व तत्कालीन ग्याझेटीअर्समधून संदर्भ सोडून उतारे उद्धृत करतात .ब्रिटीशांनी जाती जमातींची माहिती मिळावी ह्या हेतूने अनेक ग्रंथ लिहिले आहेत .तेही आदिवासी व बिगर आदिवासी पुरावा म्हणून महात्वाचे आहेत ,अलीकडेच ‘मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाने ‘ “ पीपल्स of इंडिया “ या ग्रंथामध्ये देशातील जाती जमाती संदर्भात पुराव्यानिशी लिखाण केले आहे आणि आदिवासी जमाती संधर्भात त्यातील पुरावा अधिकृत मानला जातो .
राज्यघटनेने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये राज्यातील ४७ आदिवासी जमातींचा समावेश केलेला आहे परंतु विस्तारित क्षेत्रातिल स्वयंघोषित आदिवासी हेतुपुरास्कर महादेव कोळी , ढोर कोळी , टोकरे कोळी ,व मल्हार कोळी नावाने उतावळे होऊन ( self declaring ) आदिवासी झाले आहेत OBC अंतर्गत मोडणार्या कोळी जातीचा आणि त्यातील १७ उप्जातीचा उल्लेख अनुसूचित जमातीत केलेला नाही सोनकोळी,मच्छिमार कोळी , आहिर कोळी ,पान्भ्रे कोळी ,खानदेश कोळी ,वैती ,सूर्यवंशी ,मांगेला ,या जाती केवळ कोळी या शब्दाचा सारखेपणाने आम्हीच “महादेव कोळी “ आहोत असे सांगतात .व बनावट जातीचे दाखले घेऊन नोकरी पण करत आहेत . व सरकार त्यांना पाठीशी पण घालत आहे .आज कमीत कमी २० लाख महादेव कोळी जातीचे दाखले घेऊन मजा मारत आहेत .
आदिवासी महादेव कोळी हि जमात स्टार्ट कमिटीच्या अहवालात (१९३०) अबोरीजनल अंड हिल्स ट्राइब्स या सदरातील शेड्युल २ मध्ये क्रमांक १५ वर नमूद आहे तर सूर्यवंशी कोळी ,मांगेला ,वैती कोळी या जाती शेड्युल ३ मध्ये व अनुक्रमे ६३,७३,व ११९ वर ओबीसी म्हणून आहेत .अनेक्स “ ब “ गव्हर्मेंट of बॉम्बे पोलिटिकल and सर्विस रेजोल्युशन न.१६७३/३४ बॉम्बे कास्ट दिनांक २४/४/१९४२ (रीव्ह्लुशन ) अन्वये शेड्युल “ए” लिस्ट of इंटरमेडीयटमध्ये सोनकोळी म्हणजेच मच्छिमार कोळी हि जात क्र. ११६ वर ओबीसी म्हणून नमूद असून त्याचा फायदा ते मिळवत आहेत .
“स्टार्ट कमिटी, आदिवासी आणि प्रा.डॉ गोविंद सदाशिव धुर्ये “
१९२८ साली इंग्रज राजवटीत मा. ओ.बी.एच.स्टार्ट या इंग्रज अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली “स्टार्ट कमिटी’” स्थापन केली होती या समितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,मा.डॉ सोलंकी ,मा.ए.व्ही. ठक्कर, (ठक्कर बाप्पा ) ,इत्याती ख्यातनाम आणि मान्यवर सदस्य होते .तत्कालीन मुंबई राज्यातील अस्पृश्यांचा व आदिवासिं जमातीच्या उत्थानासाठी कोणकोणत्या उपयोजना करता येतील ,या विषयी संशोधन केले होते . १९३० साली सदरचा अहवाल सादर झाला या मुळ अहवालाचा आधार घेऊन व त्यात योग्य त्या सुधारणा करून १९५० साली राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि जमातींची यादी घोषित केली . एकूण ४७ अनुसूचित जमातिना संसदेने राज्यघटनेद्वारे आरक्षण दिले .१९५५ साली राज्य शासनाने काका कालेलकर समिती नेमली या समितीच्या शिफारसीनुसार उत्तर जातींची वर्गवारी करण्यात आली या कालावधीत कोणत्याही जातीला मर्यादित क्षेत्र्बन्धन नव्हते याच वेळी मुंबई विध्यापीठाचे थोर समाजअभ्यासक प्रा. धुर्य्रे यांनी सामाजिक ,भौगोलिक ,भौतिक ,व्यावसायिक ,सांस्कृतिक ,धर्म,रूढी,परंपरा,लग्नबंधन इत्यादी तत्वानुसार आदिवासी महादेव कोळी जमातीचे संशोधन केले व आपला अहवाल तत्कालीन मुंबई राज्य सरकारला सादर केला .त्यात आदिवासी महादेव कोळी आणि कोळी हे एक आहेत असे कुठेही लिहिले नाही शिवाय त्यांनी तसा उल्लेख देखील टाळला .मग तेव्हा पासून आजपर्यंत जो घुसखोरीचा मार्ग शोधला जातोय त्याला अडाणीपणा म्हणायचा कि पदीचे मत ..” गाजराची पुंगी ,वाजली तर वाजली ,नाहीतर चाऊन खाल्ली “ असेच म्हणावे लागेल अभ्यास करून बोंबा मारा ना कशाला तुमच्याही डोक्याला ताप आणि आमच्या आदिवासी समाजालाही . जे आश्वासने देत आहेत त्यांचे तोंड वाकडे झाले पण सरळ काही बोलता येईना .
- Vijaykumar Ghote

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti