Breaking News

Adivasi and indian constitution

  आदिवासी आणि भारतीय राज्यघटना :
आदिवासी या भूमीचा मूळ रहिवासी आहे मात्र भारतीय राज्यघटना आदिवासिना आदिवासी म्हणत नाही तर “ अनुसूचित जमाती “ म्हणते .आदिवासी जमाती या शब्दाचा अर्थ आदिवासी होतो असे जगातल्या कोणत्याच शब्दकोषात लिहिलेले नाही .कोलंबसाच्या आगमनाने जगात वसाहती निर्माण झाल्या ,ज्या युरोपीय देशात वसाहती निर्माण झाल्या त्याच देशातील आदिवासिना “जमाती “असे म्हटले गेले आहे .खरे तर “ जमाती “ हि संकल्पना युरोपियन वसाहतवादाची जननी आहे .अमेरिकेतील रेड इंडियन आदिवासींच्या जमिनीवर युरोपियन वासाह्तीद्वारा अधिसत्ता निर्माण केली गेली हे कोलंबसाच्या “ डिस्कव्हरी थेरीचा “ एक भाग होता वसाह्तवादामुळे झालेल्या नुकसानीची प्रतिपूर्ती करण्यासाठी अमेरिकेतील आदिवासिना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात आरक्षित जमिनी देण्यासठी अमेरिकेने “ Tribal Reservation Act-1830” निर्माण केला हा कायदा तयार झाल्यानंतरअमेरिकेतील रेड इंडियन आदिवासिना “ जमाती “( Tribes) संबोधण्यात आले
भारतात “ Tribes “ या शब्दाची उत्पत्ती कोणत्याच भाषेपासून झालेले नाही “ Tribes “ शब्द हा ग्रीक राज्याच्या रोमन राजाद्वारा झालेली आहे . The term “Tribes originated around the time of Greek city States and early formation of the Roman Empire. Latin term “Tribes” has since been transformed to mean. ( By Robert J. Gregory ) भारतामध्ये ब्रिटीश प्रशासनाने आदिवासिना गुन्हेगार ठरवणारा कायदा गुन्हेगारी जमाती कायदा १८७१ ( Criminal Tribal Act 1871 ) निर्माण केला अश्या प्रकारे १८७१ मध्ये आदिवासिना इंग्रज सरकारने आदिवासिना “ Tribes” म्हणून घोषित केले .
भारतीय घटनेत आदिवासिना वेगळ्या संस्कृतीक मूल्यांच्या व त्यांच्या वेगळ्या वांशिक गटांच्या आधारावर “ आदिवासी किंवा मूलनिवासी “ असे व्याख्याबद्ध करणे गरजेचे होते , तसे कधी झाले नाही. घटना समितीद्वारे मोठ्या चर्चे नंतर भारतीय आदिवासिना राज्यघटनेत काय म्हणावे हा प्रश्न कायम राहिला पुढे हा वाद ब्रिटीश सर्वोच्य न्यायालयात गेला ,त्या न्यायालयाला भंग करून “भारतीय सर्वोच्य न्यायालय “ स्थापन करण्याच्या नादात आदिवासी व्याखेचा प्रश्न कायम अनिर्णीत राहिला व राज्यघटनेत आदिवासींची व्याख्या केली गेली नाही व पुढील काळात ते आजपर्यंत युरोपियन वसाहतवादाचे अनुसूचित जमाती ( Slavery Code ) नावाच शिक्का आणि गुलामगिरीचे ओझे कायम राहिले . आदिवासींचे सांस्कृतिक मुल्ये नाकारून मूलनिवासी अस्तित्व नाकारण्यात आले . भारतीय घटना समितीवर आदिवासींचे नेतृत्व करणारे मा. जसपाल मुंडा म्हणाले कि ,आदिवासींवर सहा हजार वर्षापासून होत असलेली अन्यायाची पुनरावृती स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेत पुन्हा एकदा झाली आहे . जसपाल मुंडा यांनी आदिवासिना जंगली म्हणवणार्या घटना समितीच्या सदस्यांना ठणकावून सांगीताले कि आम्ही जंगली नाही या मातीचे मालक आहोत .तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कि राज्यघटनेत “ schedule tribe “ हा शब्द अंतिम असेल असे मी मानत नाही . येव्हडे असूनही पुढील साठ वर्ष्याच्या काळात आमच्या नेत्यांनी आदिवासींच्या नावावर निवडणुका लढवल्या ,सत्ता उपभोगली , मात्र schedule tribe हा शब्द बदलून आम्हाला “ आदिवासी किव्हा मूलनिवासी “ करा म्हणून एकदाही प्रयत्न्न केले नाही . निवडणूक आणि सत्तेच्या नादात आदिवासी माणसाला आमच्याच नेत्यांनी गुलामगिरीत टाकले जेव्हडे इत्तर लोक आदिवासी समाज्याच्या गुलामगिरीस कारणीभूत आहेत त्यापेक्षा अधिक प्रमाणात आमचे नेते ,पुढारी कारणीभूत आहेत .कारण त्यांनी अआज देखील आदिवासी हाच शब्द घटनेत समाविष्ट करावा म्हणून प्रयत्न केले नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या किती राजकीय नेत्र्यांनी आज पर्यंत राज्घात्नेचा अभ्यास केलाय किव्हा “schedule tribe” हा शब्द कुठून आणि कसा आलाय व त्याचा अर्थ तरी काय होतो याचा अभ्यास केल नाही . आज आणि यापुढे आपण सर्व आदिवासी आपल्या हक्कांसाठी नेहमीच लढत आलो आहोत मात्र एक लढा यापुडे आपले “ आदिवासीपण” राज्यघटनेत पुन्हा यावे म्हणून प्रयत्न करावे लागणार आहे आम्ही schedule triba नसून आदिवासी आहोत आंनी घटनेने आम्हाला सन्मानपूर्वक आदिवासीच म्हणावे म्हणून एक लढा उभावाराव लागणार आहे . मितानो हे विचार सर्व आदिवासी समाजसेवक ,अभ्यासक विचारवंत , आणि सर्व आदिवासी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे जातीचा दाखला मिळवतांनी आम्ही schedule tribe नसून आदिवासी आहोत हे ठणकावून सांगण्याची ताकत ,हिम्मत तयार झाली पाहिजे. आम्ही गुलाम नाही तर मालक आहोत . साभार :-
विजयकुमार घोटे

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti